महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सध्या नाना पटोले विरुद्ध बाळासाहेब थोरात असा थेट वाद पाहायला मिळत आहे. नाना पटोले सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असून ठाकरे गटानंही त्यांना लक्ष्य केलं आहे. विशेष म्हणजे सहा महिन्यांपूर्वी महाविकास आघाडीचं सरकार पडण्यामागे मुख्य कारण नाना पटोलेंची ‘ती’ कृती ठरल्याचा दावा सामनातील अग्रलेखातून करण्यात आला आहे. महाविकास आघाडीचे सरकार पडले किंवा पाडले गेले त्यामागे अनेक कारणे असली तरी मुख्य कारण म्हणजे, विधानसभा अध्यक्ष असलेल्या नाना पटोले यांनी दिलेला तडकाफडकी राजीनामा. पटोले यांचा राजीनामा हा शहाणपणाचा निर्णय नव्हता व तेथूनच संकटाची मालिका सुरू झाली. ती नंतर थांबली नाही’, अशा शब्दांत ya अग्रलेखात नाना पटोलेंवर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
#UddhavThackeray #NanaPatole #Shivsena #Congress #BJP #INC #AadityaThackeray #BalasahebThorat #SatyajeetTambe #Sangamner #MarathiNews #Politics #PradnyaSatav #Urus #Osmanabad #Maharashtra